Monday, September 14, 2009

" उगाच "

ती: " काय झालंय तुला ?, बरं वाटतं नाहीये का?"
तो: "नाही ."
ती : " मग असं का वाटतयं तुझ्या आवाजावरून ?"
तो : " खरंच काही नाही."
ती : " सांगायचं नसेल तर सांगू नकोस पण उगाच खोटं बोलू नकोस ."
तो : " मी खोटं बोलत नाहीये गं."
ती : " मग सांग बघू पटकन काय झालंय ते."
तो : " आता कोणाची शप्पथ घेऊ म्हणजे तुला खरं वाटेल ?"
ती : " घे माझी शप्पथ."
तो : " जाऊ दे."
ती : " आता का जाऊ दे ? आणि मी कुठून जाऊ देऊ ?"
तो : " माझेच डायलॉग मला ना! "
ती : " विषय बदलू नकोस ."
तो : " मी विषय बदलत नाहीये ."
ती : " तुझ्याशी ना बोलणच पाप आहे."
तो : " मग कशाला बोलतेयस, मला काही कॉल्स फ्री नाहीयेत."
ती : " हो ना ? मग कशाला केलायस फोन ?"
तो : " तू रागावलीस माझ्यावर ?"
ती : " मी कशाला रागावू ?"
तो : " तू रागावली आहेस ."
ती : "उगाच काहीतरी ."
तो : " बरं मग सांग काल काय बोलणार होतीस एवढं माझ्याशी ?"
ती : " मी ? तुझ्याशी बोलणार होते काल ?"
तो : " हो. तूच तर म्हणाली होतीस ना की खूप बोलायचय तुझ्याशी म्हणून ."
ती : " हं . बोलणार होते पण आता काही आठवत नाहीये ."
तो : " हे काय आता ?"
ती : " म्हणजे मी विसरले ."
तो : " हे बरंय हां तुझं . माझ्याकडून सगळ बरोबर काढून घेतेस आणि स्वतः ची वेळ आली की घेतलीच यांनी माघार ."
ती : " काहीतरीच काय .. यांत माघार कसली . तू काहीतरी वेगळ नाही बोलू शकत , म्हणजे मला पटेल असं ."
तो : " मी काहीही म्हटलं तरी तुला ते कधी पटणार आहे का ?'
ती : " तुला भांडायचं आहे माझ्याशी ?"
तो : " मला काय वेड लागलयं का दगडावर डोकं आपटून घ्यायला ?'
ती : " म्हणजे मी दगड ना ?'
तो : " हे बघ मला तसं म्हणायचं नव्हतं ."
ती : " मग काय म्हणायचं होतं तुला ?"
तो : " तू ना शब्दशः अर्थ घेतेयस."
ती : " तुझ्याशी बोलणच व्यर्थ आहे ."
तो : " मग कशाला बोलतेयस?"
ती : " यापुढे नाही बोलणार ."
तो : " बघं हं कधीच नाही बोलणार ?"
ती : " "
तो : " ठीक आहे मी ठेवतो मग ."
ती : " "
तो : " बाय ."
ती : " बाय आणि उद्या नक्की फ़ोन कर . मला काही बोलायचय तुझ्याशी ."
तो : " कशाला उगाच एकटाच बडबड़ायची हौस नाहीये मला ."
ती : " तू पुन्हा भांडतोयस माझ्याशी ?"
तो : " नाही गं बाई . चल आता उशीर झालाय आपण उद्या बोलू ."
ती : " हं गुड नाईट . बाय ."
तो : " बाय .."

4 comments:

  1. " नाही गं बाई . चल आता उशीर झालाय आपण उद्या बोलू ."
    hyachya nantar ajun ek line add kar...
    " mala khup kaam ahe.. :P "
    baki dailogues suite hotaye... :)

    ReplyDelete
  2. tho thi wala story bahut pakkav hai....rest is nice..... now its totally true that u boozee b4 u blog...... hahahahaaa......

    ReplyDelete
  3. माझा अनुभव :-

    ती :हेलो ..
    तो :हा हेलो...
    ती : बिझी आहेस ?
    तो :ह.. चालू आहे काम ..
    ती :सॉरी ह . काल संध्याकाळी नाही जमलं फोन करायला ..
    तो : ठीक आहे . काय करणार .. मला जमत नसेल तरी जमून घेतो आणि तुम्ही काय मुलींची जात ना ..लागत आम्हाला adjust करायला...
    ती : मी नाही का करत adjust ?? आज वर किती वेळ करत आलेय ... जाऊन देत .. बाकी काय ...
    तो : पण मी तुझ्यापेक्षा जास्त adjust करतो.
    ती : मग केलच पाहिजेस .. प्रेम करतोस ना ..
    तो : हो मग..
    ती : मग करायचं adjust .
    तो : अजून किती वेळ ??
    ती : लग्न होईस्तोवर ...
    तो : पण मला तो पर्यंत भावना नाहीत का ???
    ती : मलाही आहेत ना ... पण आपल्याच साठी करतेय ना मी हे .
    तो : हे बरय तुला जमेल तेव्हा बोलायच जरी मला शक्य नसेल तरी आणि मला जमेल तेव्हा तुला शक्य नसत ...
    ती : मग जमत नसेल तर नको बोलू ...मी नाही फोन करणार तुला
    तो : नको करूस जा ...ठेव फोन...

    ती फोन बंद करते ... तो फोन लावतो...

    तो : सॉरी माझी चूक झाली .. खरंच सॉरी ...
    ती : ठीके ...
    तो : अग खरंच सॉरी..

    ReplyDelete