Tuesday, March 30, 2010

द्विधा

येणारा प्रत्येक क्षण असोशीने जगण्यातली धुंदी उद्याच्या अनिश्चिततेचा विचार करून कशाला उतरवायची ?
पण म्हणजे भविष्याचा विचारच करायचा नाही का? जोवर जे सहज हाती येतंय ते आणि तेवढंच उपभोगत रहायचं ,उद्या कदाचित ते नसेलही हा विचारही मनाला शिवू द्यायचा नाही. पण हा मनाचा दांभिकपणा नाही का?
आयुष्यात येणारा क्षण न क्षण उत्कटतेनं जगताना त्यासोबत येणारी जबाबदारी कशी विसरता येईल ? किंबहुना असं उत्कट जगणंच तर देतं सजग जाणीव आत्मभानाची. तरीही मन का कचरतं अशा क्षणांना सामोरं जायला कसली एवढी भीती वाटत असावी त्याला ? भान सुटण्याची की बेभान होउन सारं उधळून दिल्यावर येणारया रितेपणाची ....
रितेपणाची जाणीवही तशी वेगळीच म्हणजे पूर्णत्वातून येणारया अपुरेपणाची.. म्हणजे पूर्ण असं काही नाहीच . आणि पूर्णत्व म्हणजे तरी काय? या सगळ्या प्रश्नांना उत्तरं नाहीत कारण प्रत्येकाची उत्तरं वेगळी असतात , ती त्यांची त्यांनाच ठरवू देत. इथे मात्र मी स्वतः लाच सोडवू पाहतेय आज आणि उद्याच्या गुंत्यातून.

1 comment:

  1. मनातला गोंधळ इतक्या नेमक्या शब्दांमध्ये मांडला आहेस की तू खरचं द्विधा मनस्थितीत आहेस हे पटत नाही. :) आणि तोच विरोधाभास मनाला स्पर्शून गेला ...

    ReplyDelete